वारी विशेष
*दिंडी सोहळ्यासोबतच विद्यार्थ्यांनी दिले विविध संदेश* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शहर आणि परिसरातील शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत केले.* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️ *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज व सावता माळी विद्यालयतर्फे आयोजित दिंडीमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ, मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. सहायक शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी हे नियोजन केले. मुख्याध्यापक श्री. शिवलिंग नकाते व सावता माळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता शेटे मँडम, विस्तारधिकारी सौ. सायरा मुलाणी मँडम आदींची उपस्थिती होती.* तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. आषाढी एकदशीचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्तीसाठी, झाडे लावा झाडे जगवा, ग्रंथदिडी व जनजागृती फेरी काढली....