*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला* उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुराने मुलांचे स्वागत करण्यात आले. पर्यावरण रक्षण हा संदेश देत सायकलला फुगे लावून सायकलवर पहिलीच्या मुलांना बसवून मिरवणूक काढण्यात आली.शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून शालेय जीवनातील त्यांचे पहिले पाऊल जपण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा माळेवाडी अकलूज शाळेत रंगला होता. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले तसेच शाळेत नव्याने रुजू झालेल्या भक्ती नाचणे, अनिता कांबळे, वर्षा नवगिरे यांचेही स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत दिलीप वाघमारे, सुषमा राऊत यांनी औक्षण केले. मुख्याध्यापक शिवलिंग नकाते यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हास वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सदस्य महेबुब मुलाणी, सतिश साठे, आनंद बनकर, अतुल बनकर, उमेश फुले, सगुणा साठे, सारिका शेळके, सिमा कांबळे, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ललितागौरी राणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार विजय अस्वरे यांनी केले.
*उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला*
उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या, तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुराने मुलांचे स्वागत करण्यात आले. पर्यावरण रक्षण हा संदेश देत सायकलला फुगे लावून सायकलवर पहिलीच्या मुलांना बसवून मिरवणूक काढण्यात आली.शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून शालेय जीवनातील त्यांचे पहिले पाऊल जपण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा माळेवाडी अकलूज शाळेत रंगला होता. नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले तसेच शाळेत नव्याने रुजू झालेल्या भक्ती नाचणे, अनिता कांबळे, वर्षा नवगिरे यांचेही स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत दिलीप वाघमारे, सुषमा राऊत यांनी औक्षण केले. मुख्याध्यापक शिवलिंग नकाते यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हास वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सदस्य महेबुब मुलाणी, सतिश साठे, आनंद बनकर, अतुल बनकर, उमेश फुले, सगुणा साठे, सारिका शेळके, सिमा कांबळे, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ललितागौरी राणे यांनी सूत्रसंचालन केले व आभार विजय अस्वरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा