आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३















 🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁


      🌻 *आंतरराष्ट्रीय योग दिवस* 🌻

*जि.प.शाळा माळॆवाडी(अ) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*


     *९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपणा सर्वांना नम्रपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !- .*


🫀✡️या वर्षाची योग संकल्पना -वसुधैव कुुटुम्बकम, म्हणजे पृथ्वी माझे घर...💪*

 *🧘‍♂️🧘🏻‍♀️योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना*

*ऊर्जा, सामर्थ्य,आरोग्य आणि सौंदर्य प्रदान करते.*



         *या अर्थाच्या प्रार्थनेने आजच्या* *मंगल दिनाची सुरवात झाली ,निमित्त होते २१ जून -* *आंतरराष्ट्रीय योगदिन....*


https://m.facebook.com/story.php?story_fbid=1013417372981252&id=100031993553943&mibextid=ZbWKwL


*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज आंतरराष्ट्रीय योग दिन फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.* 👆👆👆



🌷 *आरोग्याचे महत्व* -

            आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये शरीराला ,आरोग्याला खूप महत्व दिले आहे ,'आरोग्यम धन संपदा' अशी माहिती सांगत शाळेच्या शिक्षिका सौ. सुरैय्या कोरबू व सौ. ललितागौरी राणे यांनी कार्यक्रमास सुरुवात केली.


🌷 *आंतरराष्ट्रीय योग दिन* -

           आज शुक्रवार दिनांक २१ जून २०२३ ला सकाळी ठीक ८.०० वाजता आमच्या *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी  ,केंद्र यशवंतनगर  ,ता  माळशिरस ,जि सोलापूर* शाळेत आंतरराष्ट्रीय योगादिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक *श्री. शिवलिंग नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली 'योग दिनाचे'* आयोजन करण्यात आले होते.


🌷 *पूरक हालचाली* -

           सुरवात शरीराला थोडी उष्णता मिळण्यासाठी हातापायांच्या ,मानेच्या पूरक हालचालींनी करण्यात आली. या सर्व हालचाली शाळेच्या शिक्षिका *सौ. तरन्नुम सय्यद व भक्ती नाचणे* यांनी घेतल्या.


🌷 *आसने* -

          पूरक हालचाली नंतर लहान इयत्तांच्या अनुषंगाने उभे राहून करावयाची ताडासन ,वृक्षासन ,त्रिकोनासन, हस्तपादासन नंतर बसून करावयाचे पद्मासन, वज्रासन ही आसने नंतर पोटावर ,पाठीवर झोपून करावयाची आसने घेण्यात आली. ही सर्व आसने *सौ. वर्षा नवगिरे व श्रीम. प्रतिभा मोहिते* यांनी घेतली.


🌷 *सूर्यनमस्कार आणि प्राणायाम* -

           सर्वांसुंदर व्यायाम प्रकार असणाऱ्या सूर्यनमस्कारांची माहिती देतांनाच सूर्याला वंदन करत सूर्यनमस्कार घालण्यात आले आणि नंतर कपालभाती ,अनुलोम विलोम ,भस्त्रीका हे प्राणायाम करून तदनंतर ओंकार ध्यानधारणा आणि शवासन  इ. विविध योग - प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक शिक्षक *आर्ट आँफ लिव्हिंग चे शिक्षक श्री. विजय मिसाळ सर* यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थांनी ,काही पालकांनी आणि सदस्यांनीही मोठ्या उत्साहात आणि आनंदात  यामध्ये सहभाग घेतला.

       

🌷 *योगा आणि व्यायामाचे महत्व* -

           आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये योगासनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे महत्त्व पटवून देण्याचे कार्य *श्रीम. कांबळे मँडम व श्री. विजय अस्वरे* यांनी केले.


*🌷सकस आहार*-


सध्याच्या काळात आपले सकस आहारकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे महत्व पटवून देण्याचे कार्य *सौ. सुषमा राऊत व श्री. दिलीप वाघमारे* यांनी केले.


🌷 *योग प्रार्थना व आनापान साधना*


योग प्रार्थना व शांत वातावरणात आनापान साधना घेत *सौ. तरन्नुम सय्यद* यांनी विद्यार्थ्यांना अधिक उत्साही व शांत बनवले.


🌷 *फलकलेखन*-

अक्षरमित्र *श्रीम. पद्मश्री थिगळे* यांनी अतिशय सुंदर हस्ताक्षरात फलकलेखन केले. 


🌷 *फोटोग्राफी*

*संपूर्ण कार्यक्रमाचे फोटो *श्रीम. पद्मश्री थिगळे व श्रीम.मनिषा पांढरे* यांनी काढले.


🌷 *फेसबुक लाईव्ह*-

 कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुकवर लाईव्ह करण्याचे काम *श्री. विजय अस्वरे, श्री. दिलीप वाघमारे व श्रीम. मनिषा पांढरे* यांनी केले.



*संपूर्ण योगक्रिया व आसनप्रकारात शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी होते.*





🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट