वारी विशेष

 *दिंडी सोहळ्यासोबतच विद्यार्थ्यांनी दिले विविध संदेश*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



*वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शहर आणि परिसरातील शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे  ठिकठिकाणी स्वागत केले.*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️


 *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज व सावता माळी विद्यालयतर्फे आयोजित दिंडीमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ, मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. सहायक शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी हे नियोजन केले. मुख्याध्यापक श्री. शिवलिंग नकाते व सावता माळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता शेटे मँडम, विस्तारधिकारी सौ. सायरा मुलाणी मँडम आदींची उपस्थिती होती.*



तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले. आषाढी एकदशीचे औचित्य साधून प्लास्टिक मुक्तीसाठी, झाडे लावा झाडे जगवा, ग्रंथदिडी व जनजागृती फेरी काढली. स्वच्छताविषयक प्रबोधन फलक, प्लास्टिक हटावचा नारा देत दिंडी निघाली. यावेळी शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करावे, असा संदेशही देण्यात आला. दिंडीत सर्व पालक व गावकरीही सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जूनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जूळलेली आहे. खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात सर्वजण सहभागी होतात.

यावेळी लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी, यासह पायी दिंडीतून जनजागृतीद्वारे विद्यार्थी मनावर संप्रदायीक बाबी प्रतिबिंबित करण्याचे कार्य दिंडी सोहळ्यातून शाळेने राबविले. *यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उल्हास वाघमोडे, सदस्य महेबुब मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते*.


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🌻🚩🌻🚩🌻🚩🌻🚩🌻







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३