शनिवार-फनिवार
*दप्तराविना शाळा*
*शनिवार- फनिवार*
🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠
*उपक्रम क्र. १*
*उपक्रमाचे नावः आनंददायी शिक्षण, आनापान साधना व नवीन पुस्तकांना कव्हर बसविणे.*
🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣
*सन. २०२३-२४*
*जि. प. प्रा. शाळा माळेवाडी अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर*
*केंद्र - यशवंतनगर*
🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠
*आज दि. १७/०६/२०२३ वार- शनिवार रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, माळेवाडी अकलूज येथे दप्तराविना शाळा यात यावर्षीच्या नवीन शैक्षणिक वर्षातील पहिलाच उपक्रम घेण्यात आला. यात सुरुवातीला सौ. भक्ती नाचणे, श्रीम. वर्षा नवगिरे, श्रीम. सुरैय्या कोरबू यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर आवाजात प्रार्थना म्हणत मुलांकडून प्रार्थना म्हणवून घेतली. आमच्या शाळेतील अक्षरमित्र श्रीम. पद्मश्री थिगळे मँडमनी मुलांना आनंददायी पध्दतीने अतिशय सुंदर अशा विविध गीतांचा कृतीयुक्त सराव करवून घेतला. शाळेतील आनापान साधनेची आवड असणाऱ्या सौ. तरन्नुम सय्यद मँडम यांनी विद्यार्थ्यांकडून आनापान साधना करवून घेतली. अतिशय गोड आवाजात आनापान साधनेची माहिती विद्यार्थ्यांना देत आनंददायी वातावरणात सर्व विद्यार्थी व आम्ही शिक्षकही या साधनेत कधी ध्यानस्त झालो हेच समजले नाही. सौ. ललितागौरी राणे व श्रीम. प्रतिभा गोडसे मँडम, श्रीम. सुषमा राऊत यांनी विद्यार्थ्यांकडून पाढे व पसायदान म्हणवून घेतले. सर्व उपक्रमानंतर पहिल्या सत्रात सौ. ललितागौरी राणे मँडम यांच्याकडून आम्हा सर्वांना पोहे व जिलेबी यांचा नाष्टाही मिळाला.*
📚📚📚📖📚📚📖📚📚
*नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले परंतु विद्यार्थ्यांनी पुस्तकांना कव्हर लावलेले नव्हते. पुस्तकांची सुरक्षितता म्हणून पुस्तकांना कव्हर बसविणे ही कृती शिक्षिका श्रीम.मनिषा पांढरे, श्रीम. कांबळे मँडम, विजय अस्वरे व दिलीप वाघमारे यांनी करवून घेतली. हे सर्व उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. शिवलिंग नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.*
📚📖📚📖📚📖📚📖📚









Mastch...keep it up
उत्तर द्याहटवा