माळेवाडी (अ) शाळेच्या परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न..!!*
*!!माळेवाडी (अ) शाळेच्या परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न..!!* 🪴🌱🪴🌱🪴🌱🪴🌱🪴 *आज शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या शुभहस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली.* 🌲🎄🌲🎄🌲🎄🌲🎄🌲 *संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे तो म्हणजे असा की,* *वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.....* *वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे महत्त्व लक्षात घेता आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले.* ☘️🌴☘️🌴☘️🌴☘️🌴☘️ *या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करून येणाऱ्या काळात अजुनही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्याचा आमचा मानस आहे.* *जि.प.आ.प्रा.शाळा माळेवाडी अ* 🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴