स्वातंत्र्य दिन
🌻🌷🌻🌷🌻🌷🌻🌷🌻
*जि. प. प्रा. शाळा माळेवाडी अकलूज येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯
*"उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,*
*नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…*
*स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा"*
🇹🇯🇹🇯
*जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे आज दि. १५ आँगस्ट रोजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत सर्व प्रतिष्ठित मान्यवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य उपस्थित होते.*
🇹🇯🇹🇯
*प्रथमतः झेंडावंदन करण्यात आले व झेंड्यास मानवंदना देऊन राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे सादरीकरण करण्यात आले.*
🇹🇯🇹🇯
*संचलन व कवायतप्रकाराचे सादरीकरण केले.*
🇹🇯🇹🇯
*विद्यार्थी भाषणे व लेस्ट चेंज मी होणार स्वच्छता माँनिटर ही भूमिका लक्षात आणून देण्यासाठी 'जागर स्वच्छतेचा नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.*
🇹🇯🇹🇯
*शाळेत प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून बक्षिसे देण्यात आली.*
🇹🇯🇹🇯
*या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस इ. उपस्थित होत्या.*
🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯













टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा