पतंग निर्मिती व मेंहदी रेखाटन स्पर्धा

 *जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, माळेवाडी अकलूज*


*उपक्रमः नागपंचमी निमित्ताने पतंग बनवणे, उडवणे व मेंहदी स्पर्धा*

🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍🐍

*शनिवार-फनिवार*


*वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!*


🌻🌷🌻🌷🌻🌷🌻🌷🌻

*दप्तराविना शाळा उपक्रमातंर्गत आज जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे मुलींसाठी मेंहदी रेखाटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता पहिलीपासून ते सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.*



*तसेच मुलांसाठी पतंग निर्मिती करणे व पतंग उडवणे स्पर्धा घेतली गेली. मुलांना शाळेत पतंग उडवणे हा अनुभव आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता. मुले आनंदाने व चढाओढीने पतंग उडवत होती. काही मुलांचे पतंग खूपच उंच गेले होते. हा आनंद मुलांसोबत आम्ही शिक्षकांनीही अनुभवला.*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*अशाप्रकारे सर्वांनीच सणाचा आनंद अनुभवला.*








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३