जागर योजनांचा मातापालक सभा
**जागर योजनांचा उपक्रमातंर्गत माळेवाडी अकलूज येथे मातापालक सभेचे आयोजन**
🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣
*आज दिनांक 15 जुलै 2023 वार शनिवार रोजी जि प प्रा. शाळा माळेवाडी अकलूज मध्ये जागर योजनांचा या उपक्रमांतर्गत माता पालक व शिक्षक पालक संघाची सभा घेण्यात आली.*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. त्यानंतर सभेमध्ये उपस्थित सर्व पालकांना मुख्याध्यापक श्री. शिवलिंग नकाते यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली. त्याबरोबर सर्व शासकीय योजनांची माहिती सांगणारी पीपीटी प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. योजना व त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती व कागदपत्रांची माहिती ही सांगण्यात आली.*
*शाळेसाठी उपयुक्त असणाऱ्या महत्त्वाच्या योजना जसे की मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मध्यान भोजन, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, राजीव गांधी अपघात योजना, आरोग्य तपासणी या योजना विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.*
*सहशिक्षिका सौ. ललितागौरी राणे यांनी पालकांना सेतु पुस्तिका, अभ्यासक्रम, नियोजन व परीक्षा बाबत शिक्षक व पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.*
*मातापालक सौ. मनिषा वाघमारे, सौ. रणदिवे, सौ. बनसोडे, सौ. भारती शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.*
*शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. महेबुब मुलाणी यांनीही या सभेस आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.*
*मातांच्या सकारात्मक चर्चेनंतर चहापानाने सभा संपविण्यात आली. सदरील सभेचे सूत्रसंचालन सौ. तरन्नुम सय्यद यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. विजय अस्वरे यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ, मातापालक बहुसंख्येने उपस्थित होते.*
🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा