माझी शाळा उपक्रम



आपल्याला वर्ग शिक्षकाने दिलेला अभ्यास संपला की मुले मैदानी खेळाला प्राधान्य देतात पण कोरोना प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना घरात बसून राहावे लागते. मग ती मुले आपल्या छंदात आपोआप रमून जातात.

आमच्या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये श्री.वाघमारे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकणाऱ्या वेदिकाने असाच छंद जोपासला घरातील टाकाऊ वस्तू वापरून टिकाऊ वस्तू तयार केल्या.

यामध्ये तीने पेन ठेवायचे पाऊच, साहित्य ठेवण्यासाठी बाँक्स, कानातले अशा उपयोगी वस्तू तयार केल्या.

अशा छंदामधून विद्यार्थ्यांची अभ्यासाव्यतिरिक्त इतर कौशल्य विकसित तर होतातच पण या वस्तू बनवताना कसे कष्ट पडते ,मग आपण त्या जपायला हव्यात हा संस्कार ही नकळतपणे त्यांच्यावर होतो.

चिमूकल्या वेदिका चे व तिला मार्गदर्शन करणारे तिचे वर्गशिक्षक श्री.दिलीप वाघमारे सर यांचे हार्दिक अभिनंदन......
🌹🍫🌹🍫🌹🍫🌹🍫

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३