माझी शाळा उपक्रम

*जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद*

शनिवारी दिनांक २९/२/२०२० रोजी पहाटे पुणे कडे प्रस्थान केले. कोणत्याही कार्यात प्रथमतः गणेश पुजन असते त्याप्रमाणे वाटेतील मोरगावं येथे *मयुरेश्वराचे दर्शन* करून पुढील वाटचालीस सुरुवात झाली.गाण्याच्या तालासुरात नृत्याच्या ठेक्यात नाचत, गात कधी सिंहगडाजवळ आलो हे ही समजले नाही.

त्यानंतर *सिंहगड* पाहण्याचे निश्र्चित होते. सिंहगडाच्या पायथ्याशी पोहचायला बारा वाजले होते. भर उन्हात गड चढायला होते आणि आमचे सर्व मावळे (विद्यार्थी) उपाशी होते. गड चढल्यानंतर जेवण करायचे असे ठरल्याने सर्वांनी एकापाठोपाठ एक अतिशय वेगात, चपळाईने गड चढला. सहल प्रमुख श्री. खडतरे सर मुलांना वा-याच्या वेगाने चालवत सर्व माहिती सांगत पुढे पुढे जात होते. प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व सांगत, फोटो सेशन व व्हिडीओ निर्मितीचे काम श्री. वाघमारे सर करत होते. श्री. अस्वरे सर व श्री. कोरे‌ सर सतत विद्यार्थ्यांना लक्ष देत....सर्व विद्यार्थ्यांना गणवेश घालायला सांगितला असल्याने काम सोपे झाले होते. एखाद्या विद्यार्थ्यीं इकडेतिकडे थोडासा जरी बाजूला गेला तरी लगेच लक्षात येते होते.

गड पाहून झाल्यावर सर्वांनी मिळून एकत्र जेवणाचा आनंद घेतला. गडावर पाण्याची व्यवस्था कुठे आहे याची पूर्वकल्पना घेऊनच जेवणाचे ठिकाण निश्चित केले होते.

जेवणानंतर पुढील मार्गक्रमण सुरू झाले. वाटेतील *खडकवासला धरण व परिसर* दाखवून माहिती देण्यात आली.

*कात्रज सर्प उद्यान* पाहण्यासाठी सर्वजण आतूर होते. प्राणी, पक्षी पाहण्यासाठी मुले आतूर होती. *श्री. खडतरे सर* शिटी वाजवत एका सरळ ओळीत मुलांना घेऊन पुढे जायचे आणि आम्ही मात्र मागेच असायचो😢😢
एक एक *साप, अजगर, मगर, कासवाच्या विविध प्रकारच्या जाती ,सिंह, वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण, शिक्रा, घार* असे अनेक प्राणी व पक्षी पाहतांना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच होता....

*माळेवाडी गावचे  श्री. पांडुरंग एकतपुरे हे पुण्यात राहत असल्याने आणि गावातील मुलांची सहल आपल्या पुण्यात आली हे ऐकून त्यांनी मुलांसाठी भरपूर आईस्क्रीम खायला घेऊन आले*. एक गावाकरी म्हणून किती ही आस्था🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

त्यानंतर *शनिवारवाडा पाहून झाला. दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पांना निरोप* देऊन सहल परतीच्या प्रवासाला लागली.

उरुळी कांचन येथील राधिका हाॅटेलमध्ये मुलांना शाळेच्या वतीने जेवण देण्यात आले. जेवणानंतर अकलूज कडे निघालो.... दिवसभर पळून पळून मुलं दमली होती. झोपेत कधी एकदा अकलूज माळेवाडीत पोहचलो हे ही समजले नाही.

मुख्याध्यापिका सौ प्रभावती दळवी मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने सहल अतिशय उत्तम पद्धतीने पार पडली. त्याबद्दल *शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य ,पालक आणि शिक्षक यांचे खूप खूप अभिनंदन*

**आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका व  सर्व  शिक्षकांना मोलाची साथ  दिल्याबद्दल सर्व पालकांचे, शालेय व्यवस्थापन समितीचे व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३